प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

डॉक्टराने मसाज करता येतो का अशी विचारणा केली. फिर्यादी यांना मसाज करण्यासाठी शिकवतो, असे म्हणून मसाज शिकवण्याच्य बहाण्याने त्यांच्या अंगास वाईट भावनेने स्पर्श केला

पुणे : मसाज शिकवण्याच्या बहाण्याने एका महिलेला वाईट भावनेने स्पर्श करुन तिचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टराविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या ४८ वर्षाच्या डॉक्टराचा कर्वेनगरमध्ये आयुर्वेदिक दवाखाना आहे. या ठिकाणी शुक्रवारी पावणेअकरा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी एका ५७ वर्षाच्या महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत फिर्यादीनुसार, ही महिला या डॉक्टरांकडे कामासठी विचारणा करण्यासाठी गेली होती. तेव्हा डॉक्टराने मसाज करता येतो का अशी विचारणा केली. फिर्यादी यांना मसाज करण्यासाठी शिकवतो, असे म्हणून मसाज शिकवण्याच्य बहाण्याने त्यांच्या अंगास वाईट भावनेने स्पर्श केला. तसेच ड्रावरमधील पैसे दाखवून दुपारी दीड वाजता येता का ? असे विचारून त्यांचा वियनभंग केला. सहायक पोलीस निरीक्षक गाडे अधिक तपास करीत आहेत.