करारनाम्याचा भंग आणि चोरी प्रकरणी डॉक्‍टर विरोधात गुन्हा दाखल

डॉ. सुशील कुलकर्णी याने मिळकतीच्या करारनाम्यानुसार ताबा मिळाला असतानाही करारनामा रद्द न करता फिर्यादी डॉ. मोरे यांच्या संमतीविना मिळकतीमध्ये प्रवेश केला. तसेच फिर्यादी यांच्या ड्राव्हरमधील सात लाख रुपयांची रोख रक्‍कम आणि साडेतीन लाख रुपयांचे वैद्यकिय साहित्य, असा एकूण १० लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    पिंपरी: करारनाम्याचा भंग तसेच चोरी प्रकरणी एका डॉक्‍टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चापेकर चौक, चिंचवड येथे घडली आहे. याबाबत एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुशील रमाकांत कुलकर्णी (वय ४९, रा. प्रेमलोक पार्क, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्‍टरचे नाव आहे. डॉ. भालचंद्र शांताराम मोरे (वय ५३, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सुशील कुलकर्णी याने मिळकतीच्या करारनाम्यानुसार ताबा मिळाला असतानाही करारनामा रद्द न करता फिर्यादी डॉ. मोरे यांच्या संमतीविना मिळकतीमध्ये प्रवेश केला. तसेच फिर्यादी यांच्या ड्राव्हरमधील सात लाख रुपयांची रोख रक्‍कम आणि साडेतीन लाख रुपयांचे वैद्यकिय साहित्य, असा एकूण १० लाख ५० हजारांचा ऐवज चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.