नाभिक समाजाची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा ; पाटस नाभिक संघटनेची मागणी

दौंड : बुलढाणा येथील माथेफिरू विवेक लंबे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच अशा गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी नाभिक समाजाला ऑट्रासिटी कायदा लागू करण्याबाबत पी.एस.आय.

दौंड : बुलढाणा येथील माथेफिरू विवेक लंबे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत तसेच अशा गुन्हेगारांना आळा बसण्यासाठी नाभिक समाजाला ऑट्रासिटी कायदा लागू करण्याबाबत पी.एस.आय. राजेंद्र घाडगे यांना मंगळवार (दि.९) रोजी नाभिक समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा येथील माथेफिरू विक्रम लंबे यांनी सोशल मीडियावर नाभिक समाजाबद्दल काढलेले अपशब्द व समाजाची केलेली बदनामी बद्दल त्याच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, पुढील काळात नाभिक समाजाबद्दल अशा प्रकारची होणारी बदनामी थांबविण्यासाठी नाभिक समाजाला ऑट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देऊन हा कायदा करण्यात यावा, समाजाची एस.सी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा अशी मागणी लेखी पत्राव्दारे करण्यात आली. यावेळी पाटस नाभिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ सोनवणे व इतर सदस्य उपस्थित होते,