खड्डे बुजवा अन्यथा मनसे स्टाईलने समजावू ; ऍड. रवींद्र गारुडकर यांचा इशारा

कॅंटोन्मेंट हद्दीतील जीवघेण्या खड्ड्यांच्या दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या देहूरोड शाखेने मंगळवारी ( दि. १२) ऍड. गारुडकर यांच्या नेतृत्वाखाली देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर थाळीनाद आंदोलन केले. त्यावेळी त्यांनी कॅंटोन्मेंट प्रशासनाचे खड्ड्यांकडे लक्ष वेधत प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला.

    देहूरोड : रस्त्यांवर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाला वेळ नाही. इशारा देऊनही कामे होत नसतील ते मनसेची कामाची पद्धत समजावून सांगावी लागेल. येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवा; अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र गारुडकर यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाला दिला. दरम्यान, आंदोलनाची दखल घेत येत्या २० दिवसांत मनसेने उपस्थित केलेले प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सीईओ हरितवाल यांनी दिल्याची माहिती ऍड. गारुडकर यांनी दिली.

    मसनेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, शहराध्यक्ष जॉर्ज दास, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मलिक दास, सुशील पायगुडे, अशोक कुटे, भरत बोडके, संदीप पोटफोडे, निरंजन चव्हाण, संजय शिंदे, नाथा पिंपळे, विजय भांसागरे, अक्षय जाचक, गणेश आहेर, महेंद्र शिंदे, रुपेश जाधव, संदीप साबळे, अमित बोरकर, असिफ सय्यद, हसन शेख, रॉबिज राजन आदींनी आंदोलनात सहभाग घेतला. जाधव, सरपंच रामदास येवले, आदी उपस्थित होते.

    मनसेच्या थाळीनादाची दखल कॅंटोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी घेतली असून २० दिवसांमध्ये रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. या कालावधीत खड्डे बुजविल्यास आम्ही त्यांचा यथोचित सन्मान करू; अन्यथा पुन्हा आंदोलनासाठी तयारीनिशी येऊ.

    -ऍड. रवींद्र गारुडकर, मनसे जिल्हाध्यक्ष.