…अखेर ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला केले ठार ; वनविभागाची कामगिरी

कर्जत : बारा बळी घेतल्यानंतर दोन दिवसांपासून गायब झालेला व कोणाच्याही दृष्टिक्षेपास न पडलेला नरभक्षक बिबट्या शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास करमाळा तालुक्यातील वांगी या गावाच्या शिवारात शिकारीच्या शोधात ऊसातून बाहेर पडला असताना वनविभागच्या शार्पशुटर ने जागीच ठार केल्याने करमाळा तालुक्याने सुटकेचा निश्वास सोडला.

या नरभक्षक बिबट्या ने पैठण तालुक्यातील आपेगाव येथून मनुष्य पहिला हल्ला करून माणसाचा पहिला बळी घेतला होता तर तेथून तो पाथर्डी व आष्टी या तालुक्यात मनुष्य वर हल्ला करून सात बळी घेतले होते तर याच नरभक्षक बिबट्या ने करमाळा तालुक्यात तीन बळी घेतले होते त्यामुळे या नरभक्षक बिबट्या ची दहशत निर्माण झाली होती त्यामुळे शेतकरीही आपल्या शेतात जाण्यासाठी घाबरत होते त्यामुळे पैठण ,पाथर्डी, आष्टी, जामखेड, कर्जत व करमाळा तालुक्यातील जनता भयभीत झाली होती तर या नरभक्षक बिबट्या ठार करा अशी जनतेची मागणी होती तर आमदार सुरेश धस यांनी सरकारकडे पाठपुरावा करून या नरभक्षक बिबट्या ला ठार मारण्याची परवानगी मिळविली होती तरीही हा नरभक्षक बिबट्या वनविभागाला सतत चकवा देत होता अखेर वनविभागाच्या शार्पशुटर ने यापुर्वी गोळ्या मारल्या होत्या पंरतु तो वाचला होता पण आज हा नरभक्षक बिबट्या ला शार्पशुटरलने ठार केलेच.

या बिबट्याच्या शोधासाठी संजय कडू उपवनसंरक्षक पुणे , पाटील उपवनसंरक्षक सोलापूर, कल्याण साबळे सहाय्यक उपवनसंरक्षक, सचिन रगतवाण फिरते पथक ,श्री मंडलिक , सोलापूर, नगर व पुणे येथील वनविभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.