अखेर लोणी काळभोर, लोणीकंद ठाणे शहरात समाविष्ट

लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन्ही पोलिस ठाणी आहे त्या स्थितीत शहर पोलिस दलात सामाविष्ट करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन तर लोणी कंद पोलिस ठाण्यातून वाघोली ही दोन नवीण पोलिस ठाणे सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी अंधातरी लटकल्याचे दिसून येत आहे.

    लोणी काळभोर : मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या लोणीकंद व लोणी काळभोर या ग्रामीण पोलिस दलातील दोन पोलिस ठाण्याच्या समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात करण्यास राज्य सरकारने अखेर मंगळवारी (िद. १६) दिली. राज्य सरकारच्या आदेशामुळे पुढील ४८ तासांच्या आत लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाणे आयुक्तालयात समाविष्ट होणार आहेत.

    लोणी काळभोर व लोणी कंद ही दोन्ही पोलिस ठाणी आहे त्या स्थितीत शहर पोलिस दलात सामाविष्ट करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. लोणी काळभोर पोलिस ठाण्यातून उरुळी कांचन तर लोणी कंद पोलिस ठाण्यातून वाघोली ही दोन नवीण पोलिस ठाणे सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी अंधातरी लटकल्याचे दिसून येत आहे.

    पुणे शहर पोलीस आयुक्तालयातून कांही महिन्यापूवी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू झाले आहे. ग्रामीण पोलिस दलातील लोणी काळभोर व लोणीकंद पाेलीस ठाणी पुण्यात समाविष्ट केली जात आहेत. मागील तीन महिन्यांपासून शासन दरबारी याची प्रक्रिया सुरू होती. वारंवार याची घोषणाही होत होती. अखेर तीन महिन्याच्या कालावधीनंतर शासनाने वरील दोन्ही पोलिस ठाणी शहर पोलिस दलात घेण्याचा अंतिम आदेश जारी केला आहे.