अखेर काही अटींवर मानाच्या दहाही पालखी संस्थानांचा सरकारच्या निर्णयाला पाठिंबा; भाजप एकाकी

गतवर्षी कोरोनामुळे होवू न शकलेल्या पंढरीच्या वारीला यंदातरी परवानगी मिळावी अशी वारकऱ्यांची इच्छा होती. मात्र आता सरकारने बसनेच पादूका नेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देहू, त्याचबरोबर आळंदी देवस्थाननंही विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र वारीसाठी काही दिवस शिल्लक असताना नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत दहाही संस्थानांच्या विश्वस्तांनी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवताना वारक-यांनी  काही मागण्या समोर ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे पायी वारीच्या आक्रमक निर्णयावर भाजप एकाकी पडण्याची शक्यता आहे.

  पुणे :  गतवर्षी कोरोनामुळे होवू न शकलेल्या पंढरीच्या वारीला यंदातरी परवानगी मिळावी अशी वारकऱ्यांची इच्छा होती. मात्र आता सरकारने बसनेच पादूका नेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला देहू, त्याचबरोबर आळंदी देवस्थाननंही विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र वारीसाठी काही दिवस शिल्लक असताना नियोजनासाठी घेतलेल्या बैठकीत दहाही संस्थानांच्या विश्वस्तांनी शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाला सहमती दर्शवताना वारक-यांनी  काही मागण्या समोर ठेवल्या आहेत. या निर्णयामुळे पायी वारीच्या आक्रमक निर्णयावर भाजप एकाकी पडण्याची शक्यता आहे.

  जाहीर केलेल्या निर्णयाचा लेखी आदेश मिळावा

  या मागण्यांमध्ये प्रस्थान सोहळ्याला देण्यात आलेली शंभर वारकऱ्यांची परवानगीची ही मर्यादा वाढवावी. वाखरीपासून पायी चालत जाण्यास परवानगी देताना त्याची रुपरेषा जाहीर करावी. शासनाने जाहीर केलेल्या निर्णयाचा लेखी आदेश मिळावा अशा प्रमुख मागण्या वारकरी प्रतिनिधींनी सरकारकडे केल्या आहेत. या मागण्या दहाही देवस्थानाच्या विश्वस्तांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत. कोरोनाची परिस्थिती ही असाधारण आहे. सरकारचा निर्णय मान्य आहे की नाही? यावर चर्चा न करता शासनाच्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे वारकरी प्रतिनिधी सांगत आहेत.

  भाजप आक्रमक भुमिकेवर एकाकी

  दरम्यान, राज्यात वारीच्या निर्णयावरून विरोधी पक्ष भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनेही सरकारवर टीका करत आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, या भूमिके नंतरही शासनाशी सहमती व्यक्त करत दहा देवस्थानच्या विश्वस्तांनी सरकारसोबत जाण्याची भूमिका घेतल्याने भाजपच्या आक्रमक भुमिकेची हवा निघाली आहे. या दहाही मानांच्या पालख्यांना वारीला जाण्यासाठी २० बसेस दिल्या जाणार आहेत. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करत देहू-आळंदी पालखीबरोबर शंभर जणांना जाण्यास परवानगी देण्यात आली. या सर्व पालख्यांना कोरोनाचे नियम पालन करण्याच्या अटीवरच परवानगी देण्यात आली आहे.

  हे सुद्धा वाचा