….अखेर बंडातात्यांना समजावण्यात पोलिसांना यश

वारकरी आळंदी पंढरपूर चालत येणारच, असा एल्गार बंडातात्या कराडकर यांनी केला होता. याआधी संत तुकाराम महाराज यांच्या बीज सोहळ्यासाठी सर्व वारकऱ्यांना परवानगी द्यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देहूच्या वेशीवर भजन सत्याग्रह आंदोलनदेखील केलं.

    आळंदी:  ‘सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे’, असंही आवाहन करत पायीवारीसाठी आळंदीत दाखल झालेल्या बंडातात्या पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काहीकाळ तणावाचे वातावरणा निर्माण झाले होते. मात्र आता बंडातात्या कराडकर यांनी पायी वारीचा निर्णय मागे घेतला आहे. पोलिसांच्या शिष्टाईनंतर बंडातात्या कराडकर यांनी हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी माहिती दिली आहे.

    यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना वारीत प्रत्यक्ष हजर राहून दर्शन करता येणार नाहीये. प्रातिनिधिक स्वरुपात मोजक्या वारकऱ्यांना वारीला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे या वारकऱ्यांसह देहूतून तुकाराम महाराज आणि आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतंय.