दै. ”नवराष्ट्र”च्या वृत्तानंतर  अखेर शिक्रापुरच्या प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायटी सील

प्रशासन खडबडून जागे शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये महिनाभरात चार कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेले असताना देखील

प्रशासन खडबडून जागे

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये महिनाभरात चार कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेले असताना देखील प्रशासनकडून खबरदारी घेती जात नसल्याबाबत ‘दैनिक नवराष्ट्र’ने याबाबत शिक्रापुरात प्रतिबंधित क्षेत्रात नागरिकांचा खुलेआम वावर या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले असून नुकतीच सदर औरासिटी सोसायटी सिल करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यामुळे नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहे.

-नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील औरासिटी सोसायटीमध्ये महिनाभरापूर्वी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते, त्यांनतर या आठवड्यामध्ये एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात एकाच घरातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडल्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली होती, त्यांनतर शिरूर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर औरासिटी सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र तसेच परिसरातील पाच किलोमीटरचा परिसर बफर क्षेत्र म्हणून तीन जून २०२० पासून पुढील चौदा दिवसांपर्यंत घोषित करत त्याबाबत आदेश देखील काढला आणि सोसायटीमध्ये फिरणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांची हालचाल रोखणे गरजेचे असल्याचे सांगितले. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणातील गंभीर स्वरूपाची बाब असताना देखील सदर सोसायटीमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नसल्यामुळे सर्व नागरिक खुलेआम फिरत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे दैनिक नवराष्ट्रने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच शिरूर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी सदर सोसायटी मध्ये भेट दिली. यावेळी यावेळी ग्रामविकास अधिकारी बि. बि. गोरे, तलाठी अविनाश जाधव, कृषी सहाय्यक अशोक जाधव यांसह आदी उपस्थित होते. यावेळी सोसायटी बंद करण्याचे आदेश दिले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनतर नुकताच येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला असून नागरिकांना सोसायटी मधून ये जा करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेऊन कडक पावले उचलली असल्यामुळे या सोसायटीतील सुज्ञ नागरिक समाधान व्यक्त करत आहे.