फसवणूक केल्याप्रकरणी उद्योगपती गौतम पाषाणकर यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

    पुणे : बेदम मारहाण व अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर (Gautam Pashankar) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंदवला गेला आहे.

    याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर व दीप पुरोहित अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत एका 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक आहेत. त्यांना फ्लॅट घ्यायचा होता. यादरम्यान या आरोपींनी आर्थिक फायदा व्हावा यासाठी फिर्यादीचा विश्वास संपादन करून केला. त्यानंतर त्यांना खरडीत सुरू असलेल्या मे. प्रोक्सिमा क्रिएशन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन या बहुमजली बांधकाम इमारतीतले दोन फ्लॅट दिले. त्याचा व्यवहार ठरला व करारनामा देखील झाला केला.

    दोन कोटी 87 लाख रुपयांना हा व्यवहार ठरला होता. त्यांनी 2 कोटी 40 लाख रुपये घेतले. मात्र, तक्रारदार यांना फ्लॅटचा ताबा व नोंदणीकृत दस्त तयार केले नाही. तर फ्लॅटचे खरेदीखत देखील त्यांच्या नावावर केले नाही. हे दोन्ही फ्लॅट दुसऱ्याच दोन व्यक्तींच्या नावावर केले. तसेच त्यांची फसवणूक केली आहे. तक्रारदार यांनी याबाबत विचारपूस केली. तर त्यांना जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या ऑफिसात बोलवून घेतले. तेथे आरोपी व नोकरांनी बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा पाय फ्रॅक्चर केला आहे.