पत्नीच्या चारित्र्यावर ‘तो’ घ्यायचा संशय, नंतर ठेवले बदनामीकारक स्टेट्स, पतीवर गुन्हा दाखल

सासऱ्यांनी तिला अश्लील बोलत मनास लज्जा उत्पन्न केली. तर, इतरांनी अश्लील बोलत मानसिक व शारिरीक छळ करत माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले.

    पुणे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचे बदनामीकारक व्हॉट्सऍप स्टेट्स ठेवत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. वानवडीत हा प्रकार घडला आहे.

    याप्रकरणी २३ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, अभिजीत धावडे याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या एक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहानंतर पती अभिजीतने चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच, मारहाण करत. तर, बदनामी करणारे व्हॉट्सऍप स्टेट्स ठेवत असे.

    दरम्यान, सासऱ्यांनी तिला अश्लील बोलत मनास लज्जा उत्पन्न केली. तर, इतरांनी अश्लील बोलत मानसिक व शारिरीक छळ करत माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. पैसे न आणल्यास नांदवणार नसल्याची धमकी दिली आहे. अधिक तपास वानवडी पोलीस करत आहेत.