मांत्रिक बाबाचा सल्ला ऐकला अन् पत्नीचा छळ केला; पतीविरोधात गुन्हा दाखल

    पुणे : शारिरीक समस्या लपवून ठेवत पतीने मांत्रिक बाबाचा सल्ला ऐकून पत्नीचा अमानुष छळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केसनंद भागात ही घटना घडली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

    याप्रकरणी २२ वर्षीय विवाहितेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, पती अजिंक्य जाधव, त्याच्या आई-वडिलांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य जाधव व तक्रारदार यांचा एक वर्षापूर्वी विवाह झाला आहे. दरम्यान, विवाह झाल्यानंतर अजिंक्य माहेरूवरून पैसे घेऊन येण्यासाठी छळ करत होता. तर, कोणत्यातरी मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत असे.

    तसेच, त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत होता. दरम्यान, आरोपींनी घर, जमीन मालकीचे असल्याचे सांगितले. तर, पतीच्या शरिरीक समस्या लपवून ठेवत त्यांची फसवणूक केली आहे.