पुण्यात अग्नीतांडव ! भर पहाटे कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटला आग ; मच्छी आणि चिकन दुकानांचा कोळसा

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    पुणे : शहरात आज मंगळवारी भल्या पहाटे कॅम्प परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील मच्छी आणि चिकनच्या दुकांनाना आग लागली. या आगीत २५ दुकानं जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

    अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरात छत्रपती शिवाजी मार्केटमध्ये मच्छी, चिकन आणि अन्य वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. मार्केटमध्ये आज पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

    या मार्केटमध्ये दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, दलाने काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. तोवर आगीने रौद्ररूप धारण केले होतं. या घटनेत मच्छी विक्रेत्यांची १७ आणि चिकन विक्रेत्यांची ८ अशी २५ दुकाने जळून खाक झाली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता असून, ८ गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.