पुण्यातील IISER संशोधन संस्थेला आग

यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकाराची जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांचे संशोधन साहित्य, उपकरणे, केमिकल, जाळून खाक होत आहेत.

    पुण्यातील नामांकित संशोधन संस्थेत IISERमध्ये लागली आग लागल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार रसायनशास्त्र प्रयोगशाळेतील मायक्रोओव्हनने पेट घेतल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

    यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकाराची जीवित हानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. परंतु कोट्यवधी रुपयांचे संशोधन साहित्य, उपकरणे, केमिकल, जाळून खाक होत आहेत. काही विषारी वायुंचा फैलव होण्याची सुद्धा शक्यता आहे