fire brokeout at shivshakti chemical company in kurkumbh midc area
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र पुन्हा हादरले; शिवशक्ती केमिकल कंपनीला लागली आग

गुरुवारी ( दि, १ ऑक्टोबर ) रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागल्याने कुरकुंभ, पांढरेवाडी , झगडेवाडी पुन्हा भयभीत झाली होती. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता.

  • कंपनी आगीत जळून खाक

कुरकुंभ : पुणे जिल्ह्यातील (Pune District) दौंड तालुक्यामधील (Daund Tessil कुरकुंभ औद्योगिक वसाहती मधील (Kurkumbh Midc) पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील शिवशक्ती ऑक्सलेट केमिकल कंपनीला ( shivshakti chemical company) प्राथमिक माहिती नुसार शॉटसर्किट झाल्याने आग लागून (fire brokeout) ही कंपनी आगीत जळून खाक झाली आहे. गुरुवारी ( दि, १ ऑक्टोबर ) रोजी पहाटे पावणे दोनच्या सुमारास या कंपनीला अचानक आग लागल्याने कुरकुंभ, पांढरेवाडी , झगडेवाडी पुन्हा भयभीत झाली होती. असाच प्रकार काही महिन्यांपूर्वी घडला होता.

अल्काईल अमाईन्स कंपनीला भीषण आग लागली होती. यावेळी पूर्ण परिसर खाली करण्यात आला होता. त्यानंतर काही महिन्यांनी कुसुम डिसलेशनला आग लागली होती. तर आज शिवशक्ती ऑक्सलेट या कंपनीला आग लागल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कंपनी वेगवेगळ्या मिश्रित केमिकल वर प्रक्रिया करून एकत्र असलेले केमिकल वेगळे ( डिसलेशन ) करण्याचे काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

ही आग इतकी भीषण होती की आगीचे लोटच्या लोट दिसत होते. यामध्ये कंपनीत असणारी काही चार चाकी वाहनेही जळून खाक झाली आहेत. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू होते , जवळपास दोन ते तीन तास ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशान दल कार्यरत होते. पाच पाण्याचे टँकरनी यावेळी अग्निशमन बंबाला पाणी पुरवण्याचे काम केले. या कंपनीतील संपूर्ण केमिकल संपेपर्यंत आग सुरू होती. यावेळी दौंड नगरपालिका, कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन दल तसेच ऑनर लॅब कंपनी बारामती MIDC मधील बंब असे पाच ते सहा बंब यावेळी कार्यरत होते. कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सदर कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक माहिती त्यांनी यावेळी दिली. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आम्ही घटनास्थळी आहोत तसेच पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ,आग आटोक्यात आली असून कोणीही घाबरू नये अशी माहिती पोलीस पाटील रेश्मा विनोद शितोळे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या फोनच्या सहाय्याने सर्व परिसरातील नागरिकांना संपर्क साधून माहिती दिली.

सदर घटनास्थळी पुणे ग्रामीण आर्थिक शाखेचे पोलिस निरीक्षक दबडे दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे, पोलीस पाटील रेश्मा शितोळे, सरपंच राहुल भोसले , विनोद शितोळे, आयुब शेख , पोलीस हवालदार, पंडीत मांजरे, के.बी.शिदे, मारुती हिरवे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.