सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये आग, कोणतीही जिवीतहानी नाही

पुणे कॅम्प भागातील गोळीबार मैदानासमोर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲापरेशन बेस रुममध्ये शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शाॉट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्नीशमन विभागाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे.

पुणे : पुणे कॅम्प भागातील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याचे वृत्त आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत किती नुकसान झाले तसेच आग लागल्याचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. (Fire in ICB of Sardar Vallabhbhai Patel Hospital)

पुणे कॅम्प भागातील गोळीबार मैदानासमोर असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ॲापरेशन बेस रुममध्ये शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास शाॉट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्नीशमन विभागाच्या तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात यश आले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.