कुरकुंभ एमआयडीसीत आगीचे सत्र सुरुच : सम्राट पेपर कंपनीत आगीचे भीषण तांडव ; तब्बल चार तासानंतर आग आटोक्यात

कुरकुंभ येथील औद्योगीक वसाहतीत कंपन्यांना आग लागण्याच्या घटना या सातत्याने घडत आहेत. मात्र तरीही याबाबत नागरीकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे कुरकुंभ,पांढरेवाडी,मुकदमवाडी , दौंड शहर,पाटस या परिसरातील नागरीकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऎरणीवर आला आहे.

    पाटस : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगीक वसाहतीत कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरूच आहे. आज गुरूवारी ( दि.२५ ) पहाटे चार साडेचार वाजण्याच्या सुमारास सम्राट (गोदावरी ) पेपर मिल कंपनीच्या पेपरच्या पृष्ठास आग लागल्याची घटना घडली. तब्बल चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत या आगीत कंपनीतील लाखो रूपयांचे पेपर जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले. दरम्यान, या आगीचे नेमके कारण समजू शकले नसून जीवीत हानी झाली नाही. अशी माहिती कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार दत्तात्रय चांदणे यांनी दिली.

    मागील काही दिवसापुर्वी कुरकुंभ औद्यागीक वसाहती मधील एका कंपनीच्या आवारातील गवत व पालापाचोळ्याला आग लागल्याची घटना ताजी आहे. आज पुन्हा एकदा कुरकुंभ औद्यागीक वसाहतीमधील सम्राट पेपर कंपनीतील पेपरच्या पुष्ठाला भीषण आग लागली. पेपर असल्याने आगीने काही क्षणात आगीने कंपनीच्या परिसरात पसरला गेला. आगीचे डोंब आणि धुराचे लोट आकाशात पसरले. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस स्टेनशचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तातडीने कुरकुंभ पोलीस चौकीचे पोलीस हवालदार दत्तात्रय चांदणे, ए.एम.शिंदे,एम.बी.हिरवे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कुरकुंभ औद्योगीक वसाहतीमधील दोन आग्णीशामक बंब आणि दौंड नगर पालिकेच्या आग्णिशामक बंबास पाचारण करण्यात आले.

    कंपनीत लवकर पेट घेणारे पेपर आणि साहित्य असल्याने आगीने रूद्ररूप धारण केले होते. आग्णिशामक दलाच्या जवानांनी पहाटे साडे चार वाजता लागलेली आग ही सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास आटोक्यात आली. तब्बल चार तासाचा कालवधी हा आग विझविण्यासाठी गेला.चार तासानंतर ही आग आटोक्यात आली. मात्र या आगीत जीवीत हानी टळली असली तरी कंपनीतील साहित्य या आगीत जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

    -कुरकुंभ परिसरात नागरीकांच्या सुरक्षेतेच्या प्रश्न ऎरणीवरच…
    कुरकुंभ येथील औद्योगीक वसाहतीत कंपन्यांना आग लागण्याच्या घटना या सातत्याने घडत आहेत. मात्र तरीही याबाबत नागरीकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने कसल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे कुरकुंभ,पांढरेवाडी,मुकदमवाडी , दौंड शहर,पाटस या परिसरातील नागरीकांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऎरणीवर आला आहे.