मंचरजवळील एकलहरे येथे तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या

पुणे ग्रामीणमधील मंचरजवळील एकलहरे ता. आंबेगाव येथे दिवसाढवळ्या एका तरुणाचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली.

    पुणे : पुणे ग्रामीणमधील मंचरजवळील एकलहरे ता. आंबेगाव येथे दिवसाढवळ्या एका तरुणाचा गोळ्या घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार उर्फ राण्या बाणखिले (रा. बाणखिले मळा, मंचर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राण्या बाणखिले हा सराईत गुन्हेगार आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

    दरम्यान, हा खून कोणी केला हे अद्याप समजू शकले नाही. आरोपीचा शोध घेतला जात असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात येत आहे. मंचरमध्ये गोळीबाराची घटना झाल्याची माहिती पुणे ग्रामीणमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.