प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र

घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विजवली आणि या व्यक्तीला वाचवले. मात्र, या प्रकारात ही व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे. या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पेटवून घेणारी व्यक्ती कोण आहे? तसेच याचा पत्ता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

    पुणे : पोलीस आयुक्तालयात एक थरारक घटना घडली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर एका व्यक्तीने स्व:ला पेटवून घेतले. यानंतर जळत्या अंगानेच ही व्यक्तीव पोलिस आयुक्तालायात शिरली. यामुळे पोलिस आयुक्तालायात एकच खळबळ उडाली.

    घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी आग विजवली आणि या व्यक्तीला वाचवले. मात्र, या प्रकारात ही व्यक्ती गंभीररीत्या भाजली आहे. या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पेटवून घेणारी व्यक्ती कोण आहे? तसेच याचा पत्ता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

    ही व्यक्ती चारित्र्य पडताळणी अर्थात पोलिस व्हेरिफिकेशनसाठी कार्यालयात आली होती. याच कारणातून संबंधित व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचा कुणाशी वाद झाला होता का? किंवा त्याने पेटवून घेण्यामागे नेमकं काय कारण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.