फिट पीसीएमसी सगळ्यांची जबाबदारी: आयुक्त हार्डिकर

“कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आपण कोरोना सोबत जगायचं कसं, याचं मार्गदर्शन केलं. कोरोना वॅक्सीन येईपर्यंत आपण हातावर हात धरून बसायचं नाही. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराने स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि शहराच्या आरोग्यासाठी कुठला ना कुठला तरी फिटनेसचा मंत्र घेण्याची गरज आहे.

 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने फिट पीसीएमसी मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पिंपरी-चिंचवड करांना फीट राहण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती जर चांगली असेल तर कोणत्याही आजाराला परतवून लावता येते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्याही एका खेळाचा व्यासंग लावून घ्या. फीट पिंपरी-चिंचवड ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

आयुक्त म्हणाले, “कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आपण कोरोना सोबत जगायचं कसं, याचं मार्गदर्शन केलं. कोरोना वॅक्सीन येईपर्यंत आपण हातावर हात धरून बसायचं नाही. प्रत्येक पिंपरी-चिंचवडकराने स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि शहराच्या आरोग्यासाठी कुठला ना कुठला तरी फिटनेसचा मंत्र घेण्याची गरज आहे. बॅडमिंटन, सायकलिंग, चालणे, योगासने असा कुठल्याही व्यायामाचा एक व्यासंग घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपण स्वतःच स्वताचं आयुष्य घडवणार आहोत. स्वतःची प्रतिकारशक्ती ही आपणच वाढवणार आहोत. आपल्या शरीराची जर रोगप्रतिकारक शक्ती, शरीराचा फिटनेस चांगला असेल तर कोरोना अथवा कोणताही आजार आला तरी त्यावर आपण सहज मात करू शकतो. फिट पीसीएमसी ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे