सासवडला पाच दिवसांचा जनता कर्फ्यू ; व्यापारी असोसिएशनच्या बैठकीत निर्णय

पुरंदर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले, शासनाने आवाहन केल्या नुसार सासवड व तालुक्याची परिस्थिती पाहता कोरोणा चा वाढता प्रभाव याला आवर घालण्यासाठी सासवड व पुरंदर तालुक्यातील सर्व व्यापारी व इतर व्यवसायिक यांची बुधवारी बैठक बोलली होती.

    सासवड : पुरंदर तालुक्याची मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सासवड शहरामध्ये दिवसेन दिवस कोरोना रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सासवड येथील व्यापारी असोसिएशन ची बैठक बुधवारी जैन मंदिरात घेण्यात आली. या बैठकी मध्ये सर्वांच्या विचाराने सासवडला बुधवार ते रविवारी पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय व्यापारी असोसिएशन घेतला.
    सासवड शहरातील कोरोना ची संख्या आटोक्यात आणण्यासाठी व्यापारी असोसिएशने हा निर्णय घेण्यात आला. असल्याचे असोसिएशनच्यावतीने मुख्याधिकारी विनोद जळक यांना सांगण्यात आले. तर सासवड मधील पाच दिवस जनता कर्फ्यू मध्ये अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत,असे देखील बैठकीत ठरवण्यात आले.

    -कोरोनाची साखळी तोडणे गरजेचे
    पुरंदर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संजय चव्हाण म्हणाले, शासनाने आवाहन केल्या नुसार सासवड व तालुक्याची परिस्थिती पाहता कोरोणा चा वाढता प्रभाव याला आवर घालण्यासाठी सासवड व पुरंदर तालुक्यातील सर्व व्यापारी व इतर व्यवसायिक यांची बुधवारी बैठक बोलली होती. सासवड शहरामध्ये अनेक ठिकाणी हॉट स्पॉट आहेत. काही दिवसातच संपूर्ण सासवड शहर हॉस्पॉट म्हणून निर्माण होईल. त्या आधीच आपण सावधगिरीने पावले उचलत कोरोना ची साखळी तोडणे गरजेचे आहे असल्याचे प्रास्ताविकात बोलताना चव्हाण यांनी सांगितले.

    -सेंटर्स उभारणे गरजेचे
    कोरोना वर प्रशासनाने योग्य ती पावले वेळीच उचलणे गरजेचे होते. प्रशासनाने औषध साठा करणे गरजेचे होते. परंतु पुरंदर तालुक्यातील सरकारी दवाखान्यांमध्ये साधे खोकल्याचे सुद्धा औषध मिळत नाही. त्याचबरोबर पुरंदरच्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणावर गेल्या दोन महिन्यातच सेंटर्स उभारणे गरजेचे होते. परंतु तसे झाल्याचे दिसत नाही. असे मत फळं व भाजीपाला व्यापारी हरून बागवान यांनी मत व्यक्त केले.

    यावेळी रमेश सोळंकी, मुन्नाशेठ सोळंकी, गिरीश कर्नावट, नंदूबापू जगताप, उमेश जगताप, श्याम महाजन, महेश जगताप, दिलीप चिंबळकर, हनुमंत कानगुडे, रूपचंद लांडगे, बाबा लांडगे, धर्मेंद्र गोलांडे, उदय निरगुडे, रमेश जगताप, निलेश नाचन यांच्यासह अनेक व्यापारी यावेळी उपस्थित होते.