प्रविण घुले यांना मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील आकृती फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसाय करणारे प्रवीण घुले यांना भांडणाचे कोणतेही कारण नसताना पाच जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील आकृती फ्लेक्स प्रिंटिंग व्यवसाय करणारे प्रवीण घुले यांना भांडणाचे कोणतेही कारण नसताना पाच जणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण घुले हे रविवार (दि. १४) रोजी रात्री पावणे आठ च्या सुमारास मित्र संतोष इंदोरे,विनायक इंदोरे यांच्या समवेत असताना त्यांना महेंद्र निघोट याने फोन करुन तु कोठे आहेस असे विचारले. प्रविण घुले यांनी मी सिद्धी हाँस्पिटलच्या बाजुस उभा आहे,असे सांगितले. त्यावेळी तेथे महेंद्र निघोट,आकाश शेटे,अमिर शेवाळे,सुमित आढळराव व गणेश वाबळे हे सर्वजण तेथे आले.त्यांनी येवुन प्रवीण घुले यांस मारहाण करुन शिवीगाळ,दमदाटी केली. प्रविण घुले यांचे मित्र संतोष व विनायक हे भांडणे सोडविण्यास पुढे आले असता त्यांना देखील आकाश शेटे याने दम देवुन प्रवीण घुले याच्या डोक्यात दगड मारला. याबाबत प्रवीण घुले यांनी महेंद्र निघोट राहणार निघोटवाडी मंचर,आकाश शेटे राहणार वडगाव काशिंबेग, अमिर शेवाळे,सुमित आढळराव दोघे राहणार लांडेवाडी व गणेश वाबळे राहणार मंचर यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जवान पी.एन.मडके करत आहेत.