accident

पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास यवत गावाजवळील शेरु ढाब्यानजीक परिसरातून पुढे जात होते. त्यावेळी कंटेनरचालक अमोलने रस्त्यामध्ये अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सिद्धेश्वर (५५) यांची मोटार कंटेनरला धडकली.

पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune-Solapur highway) पहाटे साडेतीनच्या सुमारास कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात (accident ) झाला आहे. यामध्ये एकाच कुटूंबातील तिघांसह पाच जणांचा मृत्यू (Five persons died) झाला आहे. यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्डे कुटुंबीय पुण्यातील (Pune) कोंढवा परिसरात राहायला होते. कामानिमित्त ते सोलापूरातील नातेवाईकांकडे गेले होते. त्यानंतर काल मध्यरात्री बाराच्या सिद्धेश्वर त्यांची पत्नी अनिता, मुलगी श्वेता, बहीण शोभा आणि संतोष काल रात्री मोटारीतून सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास यवत गावाजवळील शेरु ढाब्यानजीक परिसरातून पुढे जात होते. त्यावेळी कंटेनरचालक अमोलने रस्त्यामध्ये अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे सिद्धेश्वर (५५) यांची मोटार कंटेनरला धडकली. त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात सिद्धेश्वर यांच्यासह पत्नी अनिता (४०), मुलगी श्वेता(२३), बहीण शोभा (३८), संतोष पाटील (३८) गंभीररित्या जखमी झाले. त्यांना जवळच्या यवतच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापुर्वीच पाचही जणांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.