MPSC आंदोलनातील पाच पोलिसांना कोरोनाचा संसर्ग

आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक घटना स्थळावर दाखल झाली होती. घटनास्थळावर बंदोबस्तासाठी हजर असलेल्या विशेष शाखेतील दोन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

    पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील शास्त्रीरोड येथे हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले होते. अचानक सुरू झालेल्या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक घटना स्थळावर दाखल झाली होती. घटनास्थळावर बंदोबस्तासाठी हजर असलेल्या विशेष शाखेतील दोन अधिकाऱ्यांसह तीन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे पोलीस दलासह आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील पोलिसांना क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला आहे.

    पुणे पोलीस दलातील आतापर्यंत १ हजार ५३० पोलिसांना कोरोना झाला असून यामधील ४२ पोलिसांवर अद्यापही उपचार सुरू आहे. शहरात सध्या कोरोनाग्रस्त ४२ पोलिस उपचार घेत असून त्यामध्ये ९ अधिकारी व ३३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच ४२ पैकी १६ पोलिस हॉस्पिटलमध्ये तर २६ जण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गृह विलगीकरणात आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. हा वाढत प्रादुर्भाव आटोक्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. पण नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधनात्मक नियमांचे पालन करण्यात येत नाही. त्यामुळे प्रशासनासमोर वाढत असलेली कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. संचारबंदीच्या काळात रस्त्यावर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येत आहे.त्यामुळे पोलीस दलात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढतो आहे.