सविंदणे येथे ५० महिलांना मिळाल्या पीठ गिरण्या

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे आज दि.२२ ला ५० महिलांना ५० पीठ गिरण्या देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. रामविजय फाउंडेशन,पंचायत समिती सदस्य डॉ.सुंभाष पोकळे व नितीन नरवडे यांच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दराने या गिरण्या येथील महिलांना देण्यात आल्या. युवासेनेच्या या उपक्रमाचे उपस्थित महिला व सविंदणे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुका शिवसेना,युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी युवासेना पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे,तालुका पमुख गणेश जामदार,शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे ,युवासेनेचे तालुका प्रमुख नितीन नरवडे,हनुमंत लंघे,सरपंच संतोष मिंडे,माजी सरपंच बाबाजी पडवळ,मोहन किठे,किरण नरवडे व अनेक मान्यवर ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
शिरूरच्या पश्चिम भागातील अनेक गावांत सातत्याने सामाजिक व विधायक कामांना हातभार लावणाऱ्या रामविजय फाउंडेशनच्या माध्यमातून सविंदणे गावातील महीलांना घरीच पीठ दळता यावे या उद्देशाने ५० महिलांना ५० टक्के सवलतीच्या दराने या गिरण्या देण्याचा उपक्रम राबविल्याचे नितीन नरवडे यांनी सांगितले. तर अजून ही येथील महिलांना सवलतीच्या दरात पीठगिरण्या देण्याचा मानस डॉ.सुभाष पोकळे यांनी व्यक्त केला आहे. शिरूर तालुक्यात तालुका युवा सेनेच्या वतीने यापुढे ही हा उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा युवासेना प्रमुख बापूसाहेब शिंदे यांनी सांगितले.