टीकेकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्या; शिवसैनिकांना सल्ला देताना संजय राऊतांचा विरोधकांवर हल्ला

देशात ब्लॅक फंगसने पाय पसरले असून राज्यातही त्याचा प्रकोप वाढत चालला आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहे. अशातच, या आजारावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ब्लॅक फंगसची उपमा दिली आहे. शिवसैनिकांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपा नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे.

    पुणे : देशात ब्लॅक फंगसने पाय पसरले असून राज्यातही त्याचा प्रकोप वाढत चालला आहे. यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सर्वसामान्यांच्या चिंता वाढल्या आहे. अशातच, या आजारावरून राजकारणही चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना ब्लॅक फंगसची उपमा दिली आहे. शिवसैनिकांनी विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशा शब्दात राऊत यांनी भाजपा नेत्यांवर शाब्दिक हल्ला चढविला आहे.

    कोरोना महामारीच्या काळात मुंबईतील चांगल्या कामाची जागतिक आरोग्य संघटना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी दखल घेतली. या कामाचे विशेष कौतुक केले. मात्र एवढे चांगले काम केले तरी विरोधक टीका करतात. त्याकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष द्यावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत. शिवसैनिकांनी सकारात्मक राहून काम करावे असा सल्ला  संजय राऊतांनी दिसला.

    पुण्यात करोनाचा संसर्ग झालेल्या बालकांसाठी सुरू करण्यात आलेल्या सेंटरचे संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर निशाणा साधत शिवसैनिकांना सल्ला दिला. कोरोनाच्या महामारीत प्रत्येक ठिकाणी सरकार पोहचेल याची खात्री देता येत नाही. तर दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्था असो, की सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करीत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालय उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा आहे, असेही ते म्हणाले.