आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्याने १७ जिल्ह्यांच्या फळबाग विम्याचा प्रश्न मार्गी

लिंबू,संत्रा, मोसंबी,डाळींब,चिकू,पेरू फळपिकांसाठीही मिळणार विमा संरक्षण मिरजगाव : विमा संरक्षण योजनेतून वगळण्यात आलेल्या लिंबू पिकाला विमा संरक्षण मिळावे मतदार संघातून होत असलेल्या या मागणीला

लिंबू,संत्रा, मोसंबी,डाळींब,चिकू,पेरू फळपिकांसाठीही मिळणार विमा संरक्षण

मिरजगाव : विमा संरक्षण योजनेतून वगळण्यात आलेल्या लिंबू पिकाला विमा संरक्षण मिळावे मतदार संघातून होत असलेल्या या मागणीला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मतदारसंघातील लिंबु पिकाच्या विमा संरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत असताना तब्बल १७ जिल्ह्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता फळउत्पादक असलेल्या शेतकऱ्यांच्या लिंबू,संत्रा, मोसंबी,डाळींब,चिकू,पेरू आदी पिकांना विमा मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत असताना येथील मोठ्या प्रमाणावर शेतकरी वर्ग शासनाच्या विविध योजनांपासुन वंचित असून या योजनांमध्ये असणाऱ्या काही तांत्रिक अडचणी दूर केल्यास शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळेल. यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून अर्जही दाखल केले जातात. मात्र योजनांचे लक्षांक कमी असल्याने मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तसेच राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही.
 
-कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना दिले निवेदन
 
शेतकऱ्यांच्या या समस्या सोडवण्यासाठी आ.पवार हे गेली वर्षभरापासून पाठपुरावा करत आहेत. याबाबत त्यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत निवेदन दिले होते. या निवेदनात हवामान आधारित फळपिक योजनेमधून सन २०१९-२० पासून लिंबू व पेरू हे पीक वगळले होते. मात्र त्याअगोदर जामखेड तालुक्यामध्ये २५०० हेक्टरवर केलेल्या लिंबू पिकासाठी शेतकऱ्यांना जवळपास ५.५० कोटी इतकी हवामान आधारित फळपिक विम्याची रक्कम मिळाली होती. मात्र सबंधित पिके विम्यातून वगळल्याने शेतकऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. आमदार रोहित पवारांच्या या पाठपुराव्याने आता शासन निर्णय झाला असून या शासन निर्णयात प्रधानमंत्री फसल विमा योजनेनातर्गत पुनर्रचीत हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१,२०२१-२२,२०२२-२३ या तीन वर्षांसाठी मृग बहारामध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, चिकू,पेरू व लिंबू या या सहा फळ पिकांसाठी व आंबहारामध्ये संत्रा, मोसंबी, काजू,डाळींब, आंबा, केळी,द्राक्ष व प्रायोगिक तत्वावर स्टोबेरी या आठ पिकांकरी लागू करण्यात आली असून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना सन २०२०-२१-२२ योजनेतून लिंबू या पिकासाठी अहमदनगर, बुलढाणा, जळगाव, परभणी, सोलापूर, पुणे,जालना धुळे वाशीम, नाशिक, उस्मानाबाद, अमरावती, नांदेड, लातूर अशा एकूण १४ जिल्ह्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.