५० कोरोना लसीकरण केंद्रांसाठी; ठेकेदारी पद्धतीने २०० कर्मचाऱ्यांची नियुक्तीचा निर्णय

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लसीकरण मोहिमेसाठी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहरात ५० नवीन केंद्रांची उभारणी आणि राज्य सरकारकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत दोन महिने कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाला अटकाव करण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. लसीकरणासाठी सध्या ५० केंद्रे असून, त्यासाठी ठेकेदारी पद्धतीने २०० कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांसाठी नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी ब्रिक्स इंडिया, क्रिस्टल या मनुष्यबळ पुरवठादार कंपन्यांना सुमारे १ कोटी रुपये अदा केले जाणार आहेत.

    पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत लसीकरण मोहिमेसाठी लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. शहरात ५० नवीन केंद्रांची उभारणी आणि राज्य सरकारकडील नोंदणीकृत संस्थेमार्फत दोन महिने कालावधीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार एका लसीकरण केंद्रासाठी २ स्टाफ नर्स, १ डाटा एन्ट्री ऑपरेटर, १ वॉर्ड बॉय किंवा आया याप्रमाणे ५० कोरोना लसीकरण केंद्रांसाठी २०० कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागणार आहे.

    कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याकरिता कोरोना लसीकरण, कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, रॅपिड अन्टिजेन, आरटीपीसीआर टेस्टिंग, वॉर रूम कामकाज, विलगीकरण कक्ष, नव्याने सुरू होणारे कोरोना केअर सेंटर तसेच इतर कामकाज करण्यासाठी विविध तांत्रिक संवर्गातील पदांची आवश्यकता आहे. वैद्यकीय विभागामार्फत लसीकरण केंद्राकरिता आवश्यक लागणारे ५० वैद्यकीय अधिकारी मानधन भरती प्रक्रियेअंतर्गत उपलब्ध करून देता येतील. परंतु, स्टाफनर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय किंवा आया या संवर्गातील २०० पदे नोंदणीकृत संस्थेमार्फत उपलब्ध करून द्यावी लागणार आहेत.