‘या’ कारणामुळे तरूणाने उचलले टोकाचे पाऊल

भोसरी : लग्नासाठी तरूणीने तरूणाला नकार दिल्यामुळे तरूणाने टोकाचे पाऊल (young man took the last step)  उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भोसरी (Bhosari) येथील चक्रपाणी वसाहत येथे घडली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच, येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेची चौकशी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न जमल्यानंतर सुद्धा तरूणीने लग्नासाठी नकार दिला म्हणून मानसिक तणावाखाली येऊन तरुणाने आत्महत्या केल्याचं प्रकार घडला आहे. भरत तळपे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच या प्रकरणी कृष्णा तळपे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, उषा सरोगदे या तरुणीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

भरत आणि आरोपी तरुणी उषा यांचा विवाह ठरला होता. २१ जुलै ते ३१ जुलै या दरम्यान उषाने भरतला किरकोळ कारणांवरुन लग्न करण्यास नकार देऊन त्याला मानसिक त्रास देत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं. त्यानंतर ३१ जुलै रोजी भरतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी भरतने लिहलेली चिट्ठी सापडली असून, त्यात आपल्या आत्महत्येस उषाच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी उषाच्या विरुद्ध गुन्हा नोंद करुन तिला अटक केली आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.