पुणे जिल्ह्यात पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज ; घाटमाथ्यावर जाेरदार पावसाची शक्यता

बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पुणे शहरांत साेमवारी दिवसभर शहरांत ढगाळ हवामान हाेते. अधूनमधून सूर्यदर्शन हाेते. तापमानातही वाढ झाली हाेती, सांयकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस शहरांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

    पुणे : जिल्हा आणि शहरात पुढील चार दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. त्यानंतर काही दिवस ढगाळ हवामान राहील. तर घाटमाध्यावर जाेरदार पावसाची शक्यता आहे.

    बंगाल खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पावसाची शक्यता वाढली आहे. पुणे शहरांत साेमवारी दिवसभर शहरांत ढगाळ हवामान हाेते. अधूनमधून सूर्यदर्शन हाेते. तापमानातही वाढ झाली हाेती, सांयकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस शहरांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

    बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काेकण, मुंबई, पालघर जिल्ह्यात पुढील चार दिवसांत जाेरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्यम महाराष्ट्रात काही ठिकाणी विशेषत: नाशिक , पुणे, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा विभागात जाेरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही स्थिती नऊ तारखेपर्यंत राहू शकते. त्यानंतर पावसाचा जाेर कमी हाेण्याची शक्यता आहे.