व्हेल माश्याची उलटीची तस्करी करणाऱ्या ६ जणांना वनविभागाकडून अटक

व्हेल माशाच्या उलटी (ambergris) तस्करी करण्यात येणार असून, त्या व्यक्ती पिंपरी येथील पूर्णानगर भागात येतील. त्यानुसार वनविभागाने बनावट ग्राहक पाठवत येथे सापळा रचला.

    पुणे : व्हेल माश्याची उलटीची तस्करी करणाऱ्या ६ जणांना वनविभागाने आज सापळा रचून अटक केली. उलटीची (द्रव) किंमत मार्केटमध्ये मोठी असल्याचे सांगितले जाते. उलटी ३ किलो ग्रॅम द्रव जप्त केला आहे.

    मुहंमदनइन मुटमतअली चौधरी (वय ५८), योगेश्वर सुधारक साखरे (वय २५), अनिल दिलीप कामठे (वय ४५), ज्योतिबा गोविंद जाधव (वय ३८), कृष्णात श्रीपती खोत (वय ५९) सुजाता तानाजी जाधव (वय ४४) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    वनविभाग गुप्त माहिती काढत होते. त्यावेळी त्यांना समजले की, व्हेल माशाच्या उलटीची (ambergris) तस्करी करण्यात येणार असून, त्या व्यक्ती पिंपरी येथील पूर्णानगर भागात येतील. त्यानुसार वनविभागाने बनावट ग्राहक पाठवत येथे सापळा रचला. तसेच या ६ जणांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून व्हेल माशाची ३ किलो उलटी (द्रव) मिळून आला आहे. तर एक कार देखील जप्त केली आहे. या कारवाईने प्राणी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

    ही कारवाई उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक मयूर बोठे व त्यांच्या पथकाने केली आहे.