राजू इनामदार यांची मंचर ग्रामपंचायतीकडे मागणी मंचर : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंचर ग्रामपंचायतीने मागासवर्गीय, अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर

राजू इनामदार यांची मंचर ग्रामपंचायतीकडे मागणी
मंचर : कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे मंचर ग्रामपंचायतीने मागासवर्गीय, अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर माफ करावा,अशी मागणी काँग्रेस आय पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष राजु इनामदार यांनी केली आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर गेल्या तीन महिन्यांपासुन लॉकडाऊन सुरु असुन अनेक लोकांचा रोजगार तसेच उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. युवक बेरोजगार झाले आहेत.त्यामुळे जगात आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट उभे असल्यामुळे चालु वर्षाची ग्रामपंचायत कर घरपट्टी सरसकट माफ करावी. आर्थिक धोरणाचा निकष लावुन त्याचे टप्पे करुन त्याप्रमाणे ग्रामपंचायत कर माफ करावा. परंतु आर्थिक निकष लावताना मागासवर्गीय,अल्पयंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांचा पुर्ण ग्रामपंचायत कर माफ करावा, अशी मागणी इनामदार यांनी मंचर ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ता गांजाळे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.