इंधन दरवाढीवरून हल्लाबोल! | काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रेकिंग न्यूज़
पुणे
Published: Jul 18, 2021 07:20 PM

इंधन दरवाढीवरून हल्लाबोल!काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं, पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून ३२ ते ३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत.

    पुणे : गेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या इंधन दरवाढीमुळे अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. दरम्यान, काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी, असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

    पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने सरकार स्थापनेपासून ३२ ते ३५ लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्याचा तोटा भरुन काढण्यासाठी कर वाढ केली जात आहे. मोदी सरकार हा तोटा भरून काढण्यासाठी कर्ज तर काढतंय. त्याचबरोबर देशातल्या बँका विकणं, कंपन्या विकणं, एलआयसीचे खासगीकरण करणे असेही प्रकार सुरू आहेत. हे सर्व अत्यंत निंदनीय काम सुरु आहे. काँग्रेसने जे कमावलं ते मोदी सरकारने गमावलं. कंबरतोड करणारी इंधन दरवाढ केंद्राने मागे घ्यावी.

    कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत

    कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत. दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असं होतं नव्हतं. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. भाजपात धुतल्या तांदळासारखे होते आणि नंतर काय झालं?

    देवेंद्र फडणवीस खोटं बोलतात, दिशाभूल करणारी विधानं करतात. देवेंद्र फडणवीस किती खोटं बोलतात हे मी सांगत नाही. मी आकडे मांडले आहेत. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी काय निर्णय घेतले? असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

    तुम्हाला या बातमी बद्दल काय वाटते ?, हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा…

    Comments

    शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनं संभ्रम निर्माण होतोय का?

    View Results

    Loading ... Loading ...
    OK

    We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.