राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं निधन

  • माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे किडनी विकारानं पुण्यात निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा कोरोना अहवाल १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. परंतु शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती.

पुणे – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज पहाटे किडनी विकारानं पुण्यात निधन झालं.  ते ९१ वर्षांचे होते. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचा कोरोना अहवाल १६ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले. परंतु शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात देखील केली होती.

मात्र आज बुधवारी पहाटे २.१५ मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव निलंगा येथे आणले जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातू आणि पणतू असा मोठा परिवार आहे.

शिवाजीराव पाटील-निलंगेकर १९८५ ते८६ दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदही त्यांनी भूषवंलं आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. लातूरचा एक शक्तिशाली सहकारी नेता अशी त्यांची ओळख होती.