माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली निंबाळकर कुटुंबीयांची भेट

तालुक्यातील वडापुरी नजीक अवसरी रोड वर असणाऱ्या हनुमानवाडी या ठिकाणी काल दिनांक ७ मार्च रोजी दुपारी तीन वाजे च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन गोठ्याला आग लागली होती या मध्ये एकूण ४ जनावरांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची पाहणी करण्याकरता माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकसानग्रस्त निंबाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन परीस्थितीचा आढावा घेतला.

    भाटनिमगाव / इंदापूर : तालुक्यातील वडापुरी नजीक अवसरी रोड वर असणाऱ्या हनुमानवाडी या ठिकाणी काल दिनांक ७ मार्च रोजी दुपारी तीन वाजे च्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन गोठ्याला आग लागली होती या मध्ये एकूण ४ जनावरांचा जागीच मृत्यू झाला होता या घटनेची पाहणी करण्याकरता माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकसानग्रस्त निंबाळकर कुटुंबीयांची भेट घेऊन परीस्थितीचा आढावा घेतला.

    हनुमान वाडी येथील गोविंद निंबाळकर यांच्या गोठ्याला शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली होती.या आगीत ४ जनावरे हे जागीच मृत्युमुखी पडले तर ३ जनावरे गंभीर रित्या होरपळलेली होती.यावेळी संबंधित शेतकऱ्याने शासनाकडून मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

    यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की ही घटना दुर्दैवी असून अपघाती विमा संदर्भात पशुधन पर्यवेक्षक यांना सूचना केली असून संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे त्या बाबतीत अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.