Attempted murder case against Raosaheb Danve's son-in-law and former MLA Harshvardhan Jadhav

हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी पुन्हा एकदा सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे

पुणे: माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी पुन्हा एकदा सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे. हर्षवर्धन जाधव हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. जाधव व इशा झा यांच्या विरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद  दाखल केली आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमन चड्डा सोमावारी सकाळी आई-वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला एका चारचाकीमध्ये हर्षवर्धन जाधव व ईशा झा बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला असताना त्यांनी अरेरावी करत मारहाण केल्याचा आरोप चड्डा यांनी केला आहे. त्यानंतर १५ डिसेंबरला आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक करून, चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.