माजी खासदार निलेश राणे व माजी खासदार संजय काकडे यांनी पुणे महानगरपालिकेची लाखो रुपयांची पाणीपट्टी थकवली

खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनमुळे थकबाकीने २०० कोटींपर्यंतचा आकडा गाठला आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. म्हणून जर २५ जूनपर्यंत थकबाकी भरली नाही, तर पाणी कनेक्शन कापण्यात येणार असल्याच म्हटले आहे. तसे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    पुणे: पुणे महानगरपालिकेकडून पाणीपट्टी थकविणाऱ्या ८५६ थकबाकीदारांची जणांची यादी नुकतीच पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या थकबाकीदारांच्या यादीमध्ये भाजपचे नेते व माजी खासदार निलेश राणे ( सुमारे १७ लाख रुपये) आणि भाजपचे माजी खासदार संजय काकडे (सुमारे ६६ लाख रुपये) यांच्यासह अनेक नामांकित शिक्षणसंस्था सरकारी कार्यालय आणि बिल्डरचा देखील समावेश आहे.
    या यादीवरून महापालिकेची २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकली असल्याचे स्पष्ट दिसून आले असून , महानगरपालिकेने या सर्व थकबाकीदारांना नोटीस बजावली आहे.परंतु, वसुलीसाठी महापालिका प्रशासनावर अनेकदा बड्या नेत्यांचे दबाव येत असल्यामुळे थकित रक्कमेची वसुली करणे पुणे महानगरपालिकेला अशक्य होऊन बसते

    खासगी आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारच्या पाण्याच्या कनेक्शनमुळे थकबाकीने २०० कोटींपर्यंतचा आकडा गाठला आहे. त्यामुळे आता वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. म्हणून जर २५ जूनपर्यंत थकबाकी भरली नाही, तर पाणी कनेक्शन कापण्यात येणार असल्याच म्हटले आहे. तसे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. या दरम्यान, ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेकडून यादी जाहीर केली असली, तरी परंतु प्रत्यक्षात मात्र बड्या राजकीय हस्तींकडून थकबाकीची वसूली होणार का? हा प्रश्न उपास्थित केला जात आहे.