पुण्याच्या माजी महापौरांचा कोरोनामुळे मृत्यू, अंतिम संस्कारासाठी वणवण

माजी महापौर दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी अनेक रुग्णलयांशी संपर्क साधला. पण सुरुवातीला त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. त्यांना रात्री उशिरा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल झाल्यानंतरही त्यांच्यावर वेळेत उपचार मिळाले नाहीत.

पुणे : पुण्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. यामुळे अनेक राजकीय नेत्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे पुण्यातील आरोग्य प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पुण्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे बेडस उपलब्ध होत नाही आहेत. यामुळे पुण्याच्या माजी महापौरांचा देखील बेड न मिळाल्याने मृत्यू झाला आहे.(The former mayor of Pune did not get this bed)

पुणे महापालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद तथा दत्ता एकबोटे यांचे मध्यरात्री सव्वा बाराच्या दरम्यान कोरोनाने ससून रुग्णालयात निधन झाले. ते ८४ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि नातू आहे. कोरोनाने या आधीही त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर उभा केला होता. नुकतेच त्यांच्या ज्येष्ठ मुलाचे आणि तरुण मुलाचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

माजी महापौर दत्ता एकबोटे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी अनेक रुग्णलयांशी संपर्क साधला. पण सुरुवातीला त्यांना कुठेच जागा मिळाली नाही. त्यांना रात्री उशिरा ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल झाल्यानंतरही त्यांच्यावर वेळेत उपचार मिळाले नाहीत. माजी नगरसेविका मीनाक्षी काडगी यांच्या मदतीने खासदार गिरीश बापट, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचारास सुरुवात झाली.

परंतु वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी देखील मृतदेहाची हेळसांड झाली. अंत्यसंस्कारास देखील बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. निधनानंतर त्यांचं पार्थिव प्रथम केलास स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे जागा नसल्याने त्यांना येरवडा इथं नेण्यात आले. आणि त्यानंतर कोरेगाव पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जर माजी महापौरांच्या परिवारास एवढा त्रास सहन करावा लागत असेल तर सामान्य जनतेला कशी दाद मिळणार असा गंभीर प्रश्न आता पुण्यात निर्माण होत आहे.