मारहाण प्रकरणी शिक्रापूरच्या माजी उपसरपंचाला कोठडी

शिक्रापूर : येथील एका युवकाला त्याच्या घरामध्ये घुसून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूरचे माजी उपसरपंच तसेच त्यांचा साथीदारांवर गुन्हे दाखल करत पोलिसांनी तिघांना अटक केली होती.

 शिक्रापूर : येथील एका युवकाला त्याच्या घरामध्ये घुसून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिक्रापूरचे माजी उपसरपंच तसेच त्यांचा साथीदारांवर गुन्हे दाखल करत  पोलिसांनी तिघांना अटक केली होती.  त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

                    शिक्रापूर (ता. शिरूर)न  येथील मारुती जाधव हे घरात झोपेलेले असताना शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले, त्यांचा मुलगा आणि अन्य आठ ते दहा लोक जाधव यांच्या घरामध्ये घुसले, या इसमांनी जाधवला शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण केली.  यावेळी जाधव याने मला का मारहाण करताय असे विचारले असता गिलबिले यांनी तू जर पुन्हा शिक्रापूर येथे दिसलास तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली, याबाबत मारुती भाऊ जाधव (वय ३० )  यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.  असताना पोलिसांनी शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय बंडू गिलबिले व त्यांच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करत दत्तात्रय बंडू गिलबिले, आकाश दत्तात्रय गिलबिले, समीर आनंदराव हजारे (सर्व रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे)  यांना अटक करून आज शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल जगताप हे करत आहे.