suresh gore died due to corona

सुरेश गोरे यांच्यावर मागील २० दिवसांपासून डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते. काल रात्रीपासूनच त्यांचे सर्व अवयव निकामी पडून आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अतिशय गंभीर होत चालले आहे. यापूर्वी काही नगरसेवकांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाचे दीड लाखांच्या पुढे रुग्ण गेले आहेत.

पुणे : खेड (Khed) तालुक्याचे शिवसेनेचे (shivsena) माजी आमदार सुरेश गोरे (Suresh Gore) यांचे पुण्यातील रुग्णालयात कोरोनामुळे (Corona) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांना धक्काच बसला आहे.

सुरेश गोरे यांच्यावर मागील २० दिवसांपासून डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत होते. काल रात्रीपासूनच त्यांचे सर्व अवयव निकामी पडून आज सकाळी ९ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे संकट अतिशय गंभीर होत चालले आहे. यापूर्वी काही नगरसेवकांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनाचे दीड लाखांच्या पुढे रुग्ण गेले आहेत. वेळीच उपचार घेतल्याने १ लाख ३५ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर, ३ हजार ७८६ नागरिकांचा या रोगामुळे शहरात बळी गेला आहे.

माजी आमदार सुरेश गोरे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

पुण्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आमचे सहकारी, खेड-आळंदीचे माजी आमदार, सन्माननीय श्री. सुरेश गोरे यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. सध्या शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ जुळलेले होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळं नातं होतं. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या श्री. सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत. आज आम्ही आमचा जूना सहकारी, पुणे जिल्ह्यानं एक कार्यशील नेतृत्वं गमावलं आहे. गोरे कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो ही प्रार्थना… असे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले आहे.