शिरूरमध्ये चार गावठी पिस्तूलसह चार सराईतांना अटक

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकांची कारवाई
शिक्रापूर : पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या असताना आता पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक व शिरूर पोलिसांनी कारवाई करत चौघा सराईतांना अटक करत त्यांच्याकडून चार गावठी पिस्तुल जप्त केले आहे.
-बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल
शिरूर (ता.शिरूर) येथे पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे त्यांच्या पथकासह शिरूर शहरामध्ये गस्त घालत असताना शहरामध्ये चार सराईत गुन्हेगार हे पिस्तुल बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली त्यांनतर पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख, अरुण पवार यांनी शहरात शिरूर पोलिसांच्या मदतीने सापळा लावून किरण सोनवणे, सुनील सोनवणे, संतोष मंडले सर्व रा. राळेगण थेरपाळ ता. पारनेर जि. अहमदनगर व हर्षराज शिंदे रा. बाभुळसर (ता.शिरूर) जि. पुणे यांना शिरूर येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त केले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून वरील सर्व आरोपींवर यापूर्वी खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न यासारखे अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे हे करत आहे.