दोन चिमुरड्यांसह एकाच घरातील चौघांची आत्महत्या

पुणे - जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे, तसेच आत्महत्येचेही प्रमाण वाढले आहे, कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे नोकरी

 पुणे – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाने दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे, तसेच आत्महत्येचेही प्रमाण वाढले आहे, कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे नोकरी धंदा  व पैशांची चणचण निर्माण झाली आहे. अनेक लोक याचंच टेन्शन घेवून नैराश्येच्या गर्तेत अटकत आहेत. नैराश्येतून आपले जीवन संपवत आहेत. अशीच एक घटना पुण्यात घडली आहे. दोन चिमुकल्यांसह आई-वडीलांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे. या एकाच कुटूंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यात दोन लहानग्यांचा समावेश आहे. भाऊ ( वय ६) बहिण (वय ३) आई (३२) वडील (३३) यांचा समावेश आहे

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, प्राथमिक माहिती अशी आहे की घराचा दरवाजा कोणीही न उघडल्यामुळे शेजारी पाजाऱ्यांना संशय व्यक्त केला. यामुळे त्यांनी हि माहिती पोलीसांना दिली. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला. खुप प्रयत्न करुन दरवाजा न खोला गेल्याने स्थानिकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. आत प्रवेश केल्या केल्या भयानक द्रष्य समोर आले. घरातील चौघांनी गळफास लावून घेतला होता. वडिल हे मुलांच्या शाळेचे आयडेंटीकार्ड तयार करण्याचा व्यवसाय करायचे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे घराल्या व्यक्तींसोबत आपसी मतभेद होते.