पोलीस आयुक्तालयात चार जण कोरोनाबाधित

पिंपरी : पोलीस आयुक्तालयात आज चार जण कोरोनाबाधित आढळले असून यात एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. यामुळे आयुक्तालयातील करोनाबाधित अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सहावर पोहचली आहे. दोन दिवसांपूर्वी

पिंपरी : पोलीस आयुक्तालयात आज चार जण कोरोनाबाधित आढळले असून यात एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. यामुळे आयुक्तालयातील करोनाबाधित अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सहावर पोहचली आहे. दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकास करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अवघं आयुक्तालयची इमारतच निर्जंतुक करुन घेण्यात आली होती. तर संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये आज चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.