मुंबईहून जुन्नरला आलेले चौघे करोनाबाधित

जुन्नर : शहराजवळच असलेल्या मानकरवाडी येथे नुकतेच मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील चौघेजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ह्या कुटुंबाची मुंबई येथे काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हे

जुन्नर : शहराजवळच असलेल्या मानकरवाडी येथे नुकतेच मुंबईहून आलेले एकाच कुटुंबातील चौघेजण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ह्या कुटुंबाची मुंबई येथे काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली होती. त्यामुळे हे कुटुंब दशक्रियेसाठी गावी येण्याअगोदर स्थानिकांनी आवश्‍यक ते सर्व साहित्य त्यांच्या रूमवर आणून ठेवले होते.
तसेच त्यांना सोडायला आलेली गाडी मुंबईची होती, ती त्यांना सोडून लगेच परत गेली होती. गावांतील ग्रामसेवक, तलाठी यांनी देखील आवश्‍यक अंतर ठेवून विचारपूस केली होती. त्यामुळे सोशल डिस्टनसिंग व क्वारंटाइनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळल्याने स्थानिक संसर्गाचा धोका पसरण्याची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वतःच्या आईच्या दशक्रिया विधीनिमित्त गुरुवारी (दि. ४) ते मुंबईहून आले होते; मात्र या कार्यक्रमात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला नव्हता. सर्व मंडळी गेल्यावर ते केवळ पिंडाचे दर्शन घेण्यासाठी गेल्याचे गावकरी सांगत आहेत.
दरम्यान मानकरवाडीतील या लक्षणे नसलेल्या चार रुग्णांना लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटर मध्ये हलविण्यात आले असून ‘त्या’ चारही रुग्णांचा पुन्हा स्वॅब घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.