तालुक्यात आणखी चार कोरोनाबधित ; दोन गावे कंटेंटमेन्ट झोन म्हणून घोषित

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात आज (दि.२६) चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झाली ५१ झाली आहे . अशी माहिती तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली .

 नारायणगाव :  जुन्नर तालुक्यात आज (दि. २६) चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या झाली ५१ झाली आहे . अशी माहिती तहसीलदार हणमंत कोळेकर यांनी दिली .

    शिरोली खुर्द येथे  ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व नारायणगाव जवळील धनगरवाडी येथे १ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आला आहे . धनगरवाडी गावातील रुग्ण आहे. यामुळे शिरोली खुर्द  व  धनगरवाडी हे संपूर्ण गाव हे कंटेंटमेन्ट झोन म्हणून जाहीर केले आहे.  गावात कोणीही  बाहेर जाऊन नये व बाहेरील व्यक्तीला गावामध्ये प्रवेश बंद केले आहेत.धनगरवाडी येथील रुग्ण बेलापूर मुंबई  येथून १८ जुनला आला होता .आल्या नंतर त्यांनी प्रशासनाला न कळवता माहिती लपवून ठेवली व नातेवाईकाच्या घरगुती कार्यक्रमात सहभागी आला . यामूळे त्याच्या सहवासात आलेल्याची संख्या वाढली आहे. त्याच्या सहवासात आलेल्या १२ जणांना  लेण्याद्री येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ३० जणांना  होम क्वारनटाईन करण्यात आले आहे.धनगरवाडीचे ग्रामपंचायत सदस्य महेश शेळके यांनी गावातील नागरिकांना आवाहन केले आहे कि गावात संचार बंदी लागू असल्याने जीवनावश्यक सेवा व आरोग्याशी निगडित सेवेची आवश्यकता भासल्यास ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क करावा . 
या संदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गुंजाळ यांनी आवाहन केले आहे कि पुणे,मुंबई येथून आलेल्या नागरिकांनी गावाला आल्या नंतर आपली माहिती प्रशासनाला कळविणे अत्यावश्यक आहेत व १४ दिवस स्व:ता ला होम क्वारनटाईन करून घ्यावे.  तालुक्यातील संपूर्ण प्रशासनाने गेले ३ महिने कोरोनाला रोखण्यासाठी २४ तास मेहनत घेत आहेत .पण अशा नागरिकांच्या चुकीमुळे संपूर्ण गावाला याचे परिणाम भोगावे लागतात .सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे . आपल्या एका चूकीमूळे आपल्या गावास वेठीस धरु नये.असे आवाहन प्रशासनाच्या वतीने डॉ गुंजाळ यांनी केले आहे .