वेल्हयात  चार जणांना कोरोनाची लागण

भोर : वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे येथे शनिवारी कोरोनाबाधित चार नवीन रूग्ण सापडले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी

भोर : वेल्हे तालुक्यातील वडगांव झांजे येथे  शनिवारी कोरोनाबाधित  चार नवीन रूग्ण सापडले असून त्यांच्यावर पुणे येथील रूग्णालयांत उपचार सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.नवीन बाधीतांच्या संपर्कात आलेल्या ३२ जणांना तपासणीसाठी  पुण्यात पाठवले आहे.शुक्रवारी १९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर शनिवारी  चौघांचे पॉझिटिव्ह तर व १३ जणांचे निगेटिव्ह अहवाल आले.त्यामुळे पुण्यात उपचार सुरू असलेल्या रूग्णांची संख्या आता चौदा झाली असून ते सर्वजण वडगावं झांडे येतील आहेत.तर तालुक्यातील आतापर्यंत बाधीतांची एकूण संख्या तेवीस झाली आहे.त्यातील आठ जणांनी करोनावर मात केली तर एका संशयीताचा मृत्यू झाला. शुक्रवारचा अपवाद वगळता आठवडाभर दररोज नवीन रूग्ण आढळत असल्यामुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहीले आहे.गावची लोकसंख्या साडेचारशेच्या आसपास आहे.सर्वत्र कडेकोट बंदोबस्त असला तरी कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आले नाही.तालुक्यात छुप्या मार्गाने   बाहेरून आलेल्या नागरिकांमुळे हे संकट वाढत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.