चाकण, मोशी, थेरगावात अश्या विविध ठिकाणी घडलेल्या अपघातात चार जण ठार

ट्रॅव्हल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. राजेंद्र महार (रा. विजयनगर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पिंपरी: चाकण, मोशी आणि थेरगाव येथे झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
    चाकण येथे पुणे – नाशिक महामार्गाव अपघाची घटना घडली आहे. ट्रॅव्हल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ४० वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला. राजेंद्र महार (रा. विजयनगर, मध्यप्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अपघात झाले. त्यात दोघांचा मृत्यू झाला. दुचाकीच्या धडकेत गणेश लक्ष्मण अवकीरे (वय २५, रा. चिखली) याचा मृत्यू झाला. तर, शुभम मगर जखमी झाला. दुचाकीचालक सुभाष रामू यादव (रा. भोसरी) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.तर दुसरी घटना मॉडर्न कॉलेज बस स्टॉप समोर, मोशी येथे घडली. साजिद झाहीद मलिक हुसेन (वय २६, रा. भारतमाता चौक, मोशी) याने त्याची दुचाकी भरधाव चालवून अनोळखी व्यक्तीला जोरात धडक दिली. त्यात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.

    याबाबत साजिद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेरगाव येथे दीप ज्वेलर्स जवळील चौकात एक टेम्पो वळण घेत असताना एक दुचाकीस्वार भरधाव येऊन टेम्पोला धडकला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.