राजेगाव खानवटे रस्त्यावरून पाण्याच्या प्रवाहात दोन मोटर सायकलसह चार जण गेले वाहून

संततधार पडत असलेल्या पावसाने राजेगावला ( Rajegaon Khanwate road) जोडले जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न अल्याने दोन मोटारसायकली चार जनांसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत पावले आहेत. त्यातील सर्व मृत हे खानवटे येथील आहेत मृतदेहांचा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सकाळपासून शोध घेतला असता तीन मृतदेह सापडले आहेत.

राजेगाव: संततधार पडत असलेल्या पावसाने राजेगावला ( Rajegaon Khanwate road) जोडले जाणारे मुख्य रस्ते पाण्याखाली गेले होते रात्रीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न अल्याने दोन मोटारसायकली चार जनांसह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत पावले आहेत. त्यातील सर्व मृत हे खानवटे येथील आहेत मृतदेहांचा स्थानिक नागरिकांच्या मदतीने सकाळपासून शोध घेतला असता तीन मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी आप्पासाहेब धायतोंडे वय ५५ वर्ष,कलावती धायतोंडे वय ४८ वर्ष, शाहजी (आप्पा) लोखंडे वय ५२ वर्ष हे सर्व जण राहणार खानवटे ता. दौंड जि पुणे येथील आहेत दौंड येथील जिल्हा उपरुग्णालायत शवविच्छेदन करण्यासाठी नेले आहेत त्यापैकी सुभाष लोंढे वय ४८ वर्ष यांचा शोध सुरू आहे.

रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून सुमारे चार ते पाच फूट पाणी प्रवाह वाहत असताना. मयत व्यक्तींनी ओढ्याच्या पाण्यात दुचाकी घातल्या त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते वाहून गेले आहेत. या भागातील रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी ओसंडून वाहत होते त्यामुळे वाहतूक पूर्ण पणे बंद झाली होती. मात्र आज सकाळी पुन्हा वाहतूक सुरळीत झाली आहे.याठिकाणी दौंडचे तहसीलदार संजय पाटील व पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटना स्थळी भेट देऊन पुढील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत.

हवामान खात्याने पाच दिवस पाऊस मोठ्या प्रमावर पडेल असे अंदाज वर्तवले आहेत त्यानुसार पाऊस दिवसभर पडल्याने लहान मोठया ओढ्याना पूर आले आले आहेत त्यामुळे नागरिकांना काळजी घेणे गरजेचे आहे असे अवाहन गाव कामगार तलाठी जयंत भोसले यांनी केले आहे.