अकलूज,नातेपुतेसह चार गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकावा, तरच शासन नगरपालिका-नगरपंचायतींचा आदेश काढेल : आ. रणजीतसिंह मोहिते पाटील

नातेपुते : शासन पातळीवर अकलूज नगरपालिका, नातेपुते, श्रीपुर- महाळुंग, नगरपंचायती अशा प्रकारची सर्व कार्यवाही पूर्ण झालेले असून फक्त अंतिम आदेश येण्याची आपण वाट पाहत आहोत ,त्यामुळे या चार गावातील लोकांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर सर्वसंमतीने व सर्वांनी एकत्र येऊन बहिष्कार घालावा ,तरच शासन नगरपालिका, नगरपंचायतीचा लवकरात लवकर आदेश काढेल, हे पहावे असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

नातेपुते : शासन पातळीवर अकलूज नगरपालिका, नातेपुते, श्रीपुर- महाळुंग, नगरपंचायती अशा प्रकारची सर्व कार्यवाही पूर्ण झालेले असून फक्त अंतिम आदेश येण्याची आपण वाट पाहत आहोत ,त्यामुळे या चार गावातील लोकांनी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांवर सर्वसंमतीने व सर्वांनी एकत्र येऊन बहिष्कार घालावा ,तरच शासन नगरपालिका, नगरपंचायतीचा लवकरात लवकर आदेश काढेल, हे पहावे असे आवाहन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केले.

शंकरनगर- अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत वरील 4 गावावर तांत्रिक अडचणीमुळे निवडणुका लादल्या गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

वास्तविक सप्टेंबर २०१९ रोजी राज्यपाल यांनी अध्यादेश काढून ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपालिका व नगर पंचायतीमध्ये केले आहे. परंतु शासन दरबारी कागदपत्राची पूर्तता होईपर्यंत व राजकीय शक्तीच्या अभावामुळे सव्वा वर्ष झाले तरी अंतिम आदेश बाकी असतानाच वरील ग्रामपंचायतींच्या मुदती संपल्यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला व त्यानंतर या सरकारला जाग आली. राज्यातील तेरा ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याची निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली.

या तेरा ग्रामपंचायतींमध्ये माळशिरस तालुक्यातील वरील तीन ग्रामपंचायतींचा ही समावेश आहे ,परंतु या पत्राची दखल निवडणूक आयोगाने अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही माळशिरस तालुक्यातील तीन गावांवर ग्रामपंचायतीवर निवडणुका लादल्या गेलेल्या आहेत. जनतेच्या भावनेची दखल घेऊन या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील,धैर्यशील मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, किशोर सिंह माने पाटील ,धनंजय माने देशमुख, मार्केट कमिटीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, स्वरूप राणी मोहिते पाटील, शशिकला भरते ,फातिमा पाटे वाला, एन. के. साळवे, नंदकुमार केंगार, व वरील चार गावातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी कमाल शेख, संभाजी जाधव, मुक्तार कोरबु ,नंदकुमार केंगार, प्रदुम्न गांधी ,एडवोकेट भानुदास राऊत,आदींची भाषणे झाली.

ही बैठक वस्तूस्थिती काय आहे ?यासाठी बोलावली आहे , कुणावरही टीकाटिपणी करायचा हेतू नाही. २०१८ पासून नगरपालिका, नगरपंचायती साठी काय काय केले हे जनतेला समजले पाहिजे

-आमदार रणजितसिंह मोहिते पाटील

“विकास निधी जादा प्रमाणात येण्यासाठी सर्वांनी ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार घालावा व पुढे ताकदीने लढावे ,परंतु नगरपालिका नगरपंचायतीस कुणी खो घालू नये. असे झाले तर आपला विकास खुंटणार आहे.”-एडवोकेट भानुदास राऊत,नातेपुतेचे सरपंच

“या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार घातला पाहिजे व शासनाने ही निवडणूकप्रक्रिया त्वरित थांबवली पाहिजे” -नंदकुमार केंगार (आर पी आय.नेते)

“पाणी, आरोग्य, घरकुल ,यासाठी ग्रामपंचायतीच्या चार पट निधी जादा येणार आहे. तसेच गोरगरिबांसाठी म्हाडा ची योजना आपण राबवू शकतो.” -धैर्यशील मोहिते-पाटील.