थायलंड मधील कंपनीत भागीदारीचे अमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक

नफ्याचे आमिष दाखवत २२ लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत भोसरी परिसरात हा प्रकार घडला.

    पिंपरी: थायलंड देशातील कंपनीत भागिदारी देऊन मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत २२ लाखांची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ऑगस्ट २०१८ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत भोसरी परिसरात हा प्रकार घडला.

    होमिन जसुभाई खोखर (रा. गुजरात) व दिव्यांग कानुभाई डोबारीया (रा. गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी चंद्रकांत प्रभुदास ठक्कर (वय ५४, रा. विश्रांतवाडी, पुणे) यांनी रविवारी (दि.३०) भोसरी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी चंद्रकांत यांना थायलंड देशातील थाई ॲक्वा कंपनीत भागिदारी देऊन मोठ्या नफ्याचे आमिष दिले. फिर्यादी यांनी कंपनीत २२ लाख रुपये गुंतवले मात्र, याबाबत गुंतवणूकीचा हिशोब न देता कंपनी बंद केली. व गुजरात मध्ये जाऊन दुसरी कंपनी स्थापन केली.